सातही तरुणाचे पार्थिवदेह रात्री पोहोचणार औरंगाबादेत; दोन्ही गावात पेटली नाही चूल

Foto

औरंगाबाद: सहली साठी निघालेली शरणापूर-दौलताबाद येथील  तरुणांच्या गाडीला बेळगाव येथे अपघात होऊन सात तरुण मृत्यू पावल्याची दुर्दैवी घटना काल बेळगावात घडली होती. शवविच्छेदन नंतर या तरुणाचे पार्थिव देह आज रात्री औरंगाबादेत आणण्यात येणार आहे.

 नंदू पवार (वय २८), अमोल नेवी(२६), सुरेश कणेरी(२९), अमोल चौरी (२६), महेश पांडळे (२८) महेश चावरे आणि गोपाळ पाटील  अशी अपघातात ठार झालेल्या तरुणाची नावे आहेत.

या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच शरणापूर-दौलताबाद येथील मृताचे नातेवाईक संध्याकाळी बेळगाव कडे निघाले होते.आज पहाटे पाच वाजता ते बेळगावात पोहोचल्यानंतर पोलिसांनी सर्व मृतांची ओळख पटवीत पंचनामा केला सकाळ पासून बेळगावातील शासकीय रुग्णालयात सातही तरुणाचे शवविच्छेदन सुरू होते. साधारण दुपारी दोन वाजेपर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण होईल त्या नंतर मृतदेह घेऊन नातेवाईक औरंगाबादला निघणार आहे.साधारण रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत तरुणाचे पार्थिव देह त्यांच्या मूळगावी पोहोचणार आहे अशी माहिती नातेवाईकांनी दिली.

नांदुच्या भावाचा झाला होता अपघातात मृत्यू...
नंदू पवार यांचा भाऊ सहावर्षा पूर्वी कर्णपुरा येथे आला असता सोलापूर -धुळे महामार्गावर दुचाकी अपघातात त्याचा मृत्यू झाला होता.या धक्क्यातून परिवार सावरत नाही तर पवार परिवाराला पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे.नांदुच्य मृत्यूने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे..

दोन्ही गावात चूल पेटली नाही; बाजारपेठ बंद
शरणापूर आणि दौलताबाद गावातील सात तरुण अपघात मृत्यू पावले पाच तरुण शरणापूर गावातील आहे तर दोन तरुण दौलताबाद गावातील आहे.ही दुखद बातमी दोन्ही गावात पोहोचताच दोन्ही गावातील प्रतिष्ठाने स्वतःहून बंद करण्यात आली तर गावातील एकाही घरात काल पासून चूल पेटलेली नाही